BMC Engineer Bharti Syllabus and Exam Pattern
BMC Engineer Bharti Syllabus PDF: The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) conducts recruitment exams for Junior Engineer (JE) and Sub Engineer (SE) positions in Civil, Mechanical, and Electrical Engineering. The exam includes two stages: a written test and an interview. The written exam consists of 100 multiple-choice questions carrying one mark each, with a total duration of 90 min. It covers General Awareness, Logical Reasoning/General Intelligence, and technical subjects specific to the candidate’s engineering discipline. The technical syllabus includes topics such as Structural Analysis, Soil Mechanics, and Environmental Engineering for Civil; Thermodynamics, Fluid Mechanics, and Machine Design for Mechanical; and Power Systems, Control Systems, and Electrical Machines for Electrical Engineering. General Awareness emphasizes current events, Indian history, polity, and science, while Logical Reasoning tests problem-solving and analytical abilities. Candidates must prepare thoroughly in technical subjects and current affairs to perform well. For more details, visit the official BMC website or related resources
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कनिष्ठ अभियंता (JE) आणि उप अभियंता (SE) पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करते. या परीक्षेत दोन टप्पे असतात: लेखी परीक्षा आणि मुलाखत. लेखी परीक्षेमध्ये एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण दिला जातो, आणि परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटांचा असतो. या परीक्षेत तीन मुख्य विभाग असतात: सामान्य ज्ञान, तार्किक बुद्धिमत्ता/सामान्य बुद्धिमत्ता, आणि उमेदवाराच्या अभियांत्रिकी शाखेसाठीचे तांत्रिक विषय. सामान्य ज्ञान विभागात चालू घडामोडी, भारतीय इतिहास, राजकारण, आणि विज्ञान यांचा समावेश असतो. तार्किक बुद्धिमत्तेच्या विभागात विविध प्रकारच्या समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते. तांत्रिक विषय संबंधित अभियांत्रिकी शाखेवर आधारित असतात: स्थापत्य अभियांत्रिकीसाठी स्ट्रक्चरल अॅनालिसिस, सॉईल मेकॅनिक्स आणि पर्यावरण अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकीसाठी उष्मागतिकी आणि द्रव गतिकी, आणि विद्युत अभियांत्रिकीसाठी पॉवर सिस्टीम्स आणि विद्युत यंत्रणा यांसारखे विषय असतात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी तांत्रिक आणि चालू घडामोडींचा सखोल अभ्यास केला पाहिजे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी https://formwalaa.in/syllabus.php फॉलो करा.
Selection Process For BMC Junior Engineer Exam 2025
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाकरिता निवडीचे निकष –
a) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदासाठी सेवा प्रवेश नियमानुसार विहीत केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार विहीत सामाजिक / समांतर आरक्षणानुसार तात्पुरती / अंतिम निवडयादी तयार करण्यात येईल.
b) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदासाठी निवडीचे निकषाअंतर्गत टक्केवारी पुढीलप्रमाणे असेल.
BMC कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, व विद्युत) पदांसाठीच्या पात्रतेनुसार आवश्यक गुणांची माहिती दिली आहे.
प्रवर्ग | अर्हकारी परीक्षा | टक्केवारी |
खुला | एस.एस.सी. | 50% |
मागासवर्गीय प्रवर्ग | एस.एस.सी. | 45% |
खुला | पदविका | 50% (AICTE/DTE मान्यता प्राप्त) |
मागासवर्गीय प्रवर्ग | पदविका | 45% (AICTE/DTE मान्यता प्राप्त) |
BMC Junior Engineer Exam Pattern 2025
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाकरिता घेण्यात येणा-या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये खालील वस्तुनिष्ठ प्रश्नपध्दतीचा अंतर्भाव असेल –
अ. क्र. | चाचणी | प्रश्नांची संख्या | गुण | वेळ | परीक्षेचे स्वरूप | एकूण गुणसंख्या |
1 | सामान्य ज्ञान | 20 | 20 | 90 मिनिटे | वस्तुनिष्ठ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदासाठी पात्र होण्याकरिता उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील एकूण गुणांपैकी किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. |
2 | बौद्धिक क्षमता | 20 | 20 |
|
|
|
3 | तांत्रिक ज्ञान | 60 | 60 |
|
|
|
| एकूण | 100 | 100 |
|
|
|
महत्त्वाच्या सूचना
1. कनिष्ठ अभियंता पदांकरिता घेण्यात येणा-या परीक्षेचा दर्जा भारतातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) व तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदविका परीक्षेच्या समान राहतील.
2. सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील.
3. प्रत्येक प्रश्न एक मार्काचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा करण्यात येईल.
4. मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
5. ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तात्पुरती / अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
6. सामाईक गुणवत्ता यादी तयार करताना दोन किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण असल्यास पुढील निकष लागू राहील. अ दोन किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण असल्यास पदविका परीक्षेमध्ये प्राप्त झालेले गुण ब उपरोक्त’अ’ प्रमाणे गुण समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांचा क्रम वरती लागेल. क वरील निकष लागूनही उमेदवारांचा गुणवत्ताक्रम समान येत असल्यास अशा उमेदवारांचा क्रम त्यांच्या आडनावाच्या आद्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल.
7. उपरोक्त निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्तांना रहातील.
Selection Process For BMC Sub Engineer Exam 2025
दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाकरिता निवडीचे निकष –
a) दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार विहीत केलेली अर्हता, अटी व शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार विहीत, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तात्पुरती / अंतिम निवडयादी तयार करण्यात येईल.
b) दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांसाठी निवडीचे निकषाअंतर्गत टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
अर्हकारी परीक्षा | प्रवर्ग | टक्केवारी |
एस.एस.सी. | खुला | 50% |
| सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी | 45% |
एच.एस.सी. किंवा पदविका | खुला | 50% (AICTE/DTE मान्यता प्राप्त) |
| सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी | 45% (AICTE/DTE मान्यता प्राप्त) |
पदवी | खुला | 50% |
| सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी | 45% |
BMC Sub Engineer Bharti Exam Pattern
अ. क्र. | चाचणी | प्रश्नांची संख्या | गुण | वेळ | परीक्षेचे स्वरूप | एकूण गुण संख्या |
1 | सामान्य ज्ञान | 20 | 20 | 90 मिनिटे | वस्तुनिष्ठ | दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदासाठी पात्र होण्याकरिता उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील एकूण गुणांपैकी किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. |
2 | बौद्धिक क्षमता | 20 | 20 |
|
|
|
3 | तांत्रिक ज्ञान | 60 | 60 |
|
|
|
| एकूण | 100 | 100 |
|
|
|